चित्रपटसृष्टीत पुरुषांकडून साथ मिळाली नाही – नितू चंद्राचा धक्कादायक अनुभव

चित्रपटसृष्टीत पुरुषांकडून साथ मिळाली नाही – नितू चंद्राचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्री नितू चंद्रा यांनी अलीकडेच आयएएनएसशी चित्रपट उद्योगातील असमानता आणि पुरुषांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचा अभाव याबद्दल संवाद साधला. त्यांनी वर्णन केले की, त्यांच्या सततच्या प्रयत्नांना आणि प्रतिभेला न जुमानता, त्यांच्या कल्पनांकडे दुर्लक्ष केले गेले आणि त्यांच्या योगदानाचे कमी कौतुक केले गेले. एका मुलाखतीत नितू म्हणाली, ‘बऱ्याचदा पुरुषांनी मला साथ दिली नाही. चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुषांनी माझ्या स्वप्नांवर आणि … Read more

आशिकी ३ ची घोषणा झाली, पण शीर्षक का नाही जाहीर?

आशिकी ३ ची घोषणा झाली, पण शीर्षक का नाही जाहीर?

अभिनेता कार्तिक आर्यन व श्रीलीला अभिनित आणि अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी ३’ चा अनाउंसमेंट व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सिनेमाचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘आशिकी ३’ चे ७० टक्के शूटिंग पूर्ण झाले असल्याने अनुराग सध्या या चित्रपटाचा टीझर बनवत असून पुढील ३० दिवसांत तो प्रदर्शित होणार आहे. … Read more

सोनल वेंगुर्लेकरची धमाकेदार एण्ट्री

सोनल वेंगुर्लेकरची धमाकेदार एण्ट्री

झी टीव्हीवरील ‘जमाई नं. १’ मालिकेत अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर एका महत्त्वाच्या खलनायकी भूमिकेत सहभागी होत आहे. सोनल या मालिकेत सायली देशपांडे या भूमिकेत झळकणार आहे. आपल्या भूमिकेबाबत सोनल वेंगुर्लेकर म्हणाली, मी नेहमीच असे मानते की, टेलीव्हिजनवरील खलनायिका या खूप खोल आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने लिहिल्या जातात. मुख्य पात्रांना बहुतेकवेळा सद्गुणीपणाच्या चौकटीत राहावे लागते, पण खलनायकी पात्रे … Read more

परिणीतीचा संताप सोशल मीडियावर चर्चेत – नेमकं काय घडलं?

परिणीतीचा संताप सोशल मीडियावर चर्चेत – नेमकं काय घडलं?

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात संशयास्पद ड्रोन दिसल्याच्या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे आणि देशाच्या सुरक्षेबाबत तिचे विचार मांडले आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी सेक्शनवर या घटनेचा एक वृत्तांत शेअर केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सांबा येथे ‘ब्लॅकआऊट’ दरम्यान भारताच्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोनला रोखले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

सैफचा मुलगा इब्राहिम काय म्हणतो करिनाबद्दल? उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

सैफचा मुलगा इब्राहिम काय म्हणतो करिनाबद्दल? उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

अभिनेता इब्राहिम अली खानने एका मुलाखतीमध्ये आपले वडील सैफ अली खान आणि त्यांची दुसरी पत्नी करीना कपूर यांच्याविषयी मनमोकळी बातचीत केली आहे. इब्राहिमने सांगितले की, करीनाशी माझे चांगले संबंध आहेत. तो म्हणाला की, मी चार-पाच वर्षांचा होतो, तेव्हा सैफ आणि अमृता सिंग वेगळे झाले होते. यापेक्षा अधिक मला काही आठवत नाही. परंतु माझ्या आईवडिलांना मी कधी … Read more

काजोल आणि अजयची मुलगी सिनेमात पदार्पण करणार? वाचा सविस्तर!

nysa devgan debut

अजय देवगण व काजोल यांची मुलगी न्यासाच्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाबाबत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने एक मोठी हिंट दिली आहे. मनीषने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर न्यासाचा एक स्टनिंग फोटो शेअर केला आहे. फोटोमधील न्यासाने मरून रंगाचा खूप सुंदर लेहंगा-चोली परिधान केली आहे. या फोटोसोबत मनीषने लिहिले आहे की, न्यासा, चित्रपट तुझी वाट बघत आहे. त्याच्या या पोस्टवर … Read more

कुठे गायब झाली सुनील शेट्टीची ही हिट नायिका? सध्या काय करतेय?

sharbani mukherjee border

ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ या चित्रपटाची केवळ कथाच चांगली नव्हती तर त्यातील गाणी देखील चांगली होती. आज देखील ही गाणी ऐकायला लोकांना आवडतात. या सिनेमामध्ये अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका केली होती, त्या अभिनेत्रीचे नाव आठवतेय? सुंदर चेहरा आणि घाऱ्या डोळ्यांची ही सुंदर अभिनेत्री आता कुठे आहे ? काय करते ?  त्या अभिनेत्रीचं नाव आहे शरबानी मुखर्जी. … Read more