आशिकी ३ ची घोषणा झाली, पण शीर्षक का नाही जाहीर?

अभिनेता कार्तिक आर्यन व श्रीलीला अभिनित आणि अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी ३’ चा अनाउंसमेंट व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सिनेमाचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘आशिकी ३’ चे ७० टक्के शूटिंग पूर्ण झाले असल्याने अनुराग सध्या या चित्रपटाचा टीझर बनवत असून पुढील ३० दिवसांत तो प्रदर्शित होणार आहे. मात्र सर्वात मोठी अडचण आहे ती सिनेमाच्या शीर्षकाबाबत. या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल करण्यात आलेले नाही. कारण ‘आशिकी’ शीर्षकाचे कॉपीराइट निर्माता मुकेश भट्ट यांच्याकडे आहेत. त्यामुळे या सिनेमाला ‘आशिकी ३’ हे नाव देण्याची चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार याची कितीही इच्छा असली तरी मुकेश भट्ट हे शीर्षक वापरण्यासाठी परवानगी देत नाहीत, तोपर्यंत चित्रपटाचे नाव फायनल करणे अशक्य आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे पण वाचा: काजोल आणि अजयची मुलगी सिनेमात पदार्पण करणार? वाचा सविस्तर!

हे पण वाचा: सैफचा मुलगा इब्राहिम काय म्हणतो करिनाबद्दल? उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!