बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान आता एका वेगळ्याच रूपात आपल्या सर्वाना दिसणार आहे. सुंदर विचार करायला लावणारी, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली कविता सादर करताना शाहरूख खान छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
सनफिस्ट डार्क फॅन्टसीने नवीन उपक्रम ‘फॅन्टसी जरूरी है’ ची सुरुवात केली आहे, ज्याचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एक हिंदी कविता, जी एका फिल्मच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार आणि पार्श्वगायक स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि बॉलीवूड किंग शाहरूख खान याने म्हटलेल्या या कवितेमुळे श्रोत्यांना दररोजच्या दिनचर्येपासून ते कल्पनाशक्तीच्या अमर्याद शक्यता काय असू शकतात, तिथपर्यंत एक विलक्षण आणि चिंतनशील विचार करून आनंद मिळू शकणार आहे.
यावर शाहरूख खान म्हणाला की, कल्पनाशक्ती म्हणजे शेवट नव्हे, तर स्वप्नांची सुरुवात आहे. यामुळे आपल्या आकांक्षांना चालना मिळते, खऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण थकतो, तेव्हा आपल्या ध्येयांना आकार मिळतो. ‘फॅन्टसी जरूरी है’ हे वाक्य अशाच कल्पनाशक्तीबद्दल आहे, ज्यामुळे आपण प्रगती करू शकतो.
हे पण वाचा: चित्रपटसृष्टीत पुरुषांकडून साथ मिळाली नाही – नितू चंद्राचा धक्कादायक अनुभव