जियो स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने त्यांचा मॅग्नम ओपस, राजा शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्र दिनी १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित केले आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकादेखील बजावत आहे. हा ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांच्यासह हिंदी आणि मराठी चित्रपट उद्योगातील विविध कलाकारांसह ‘राजा शिवाजी’ हा संपूर्ण भारतातील चित्रपट जागतिक स्तरावर बनवलेल्या प्रादेशिक चित्रपटांच्या शक्ती आणि क्षमतेभोवती चर्चा सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.
याबाबत रितेश देशमुख म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीयेत. ते लाखो लोकांच्या हृदयात राहणारी भावना आहेत. त्यांच्या असाधारण कथेचा एक भाग सांगणे हा सन्मान आणि मोठी जबाबदारी दोन्ही आहे. या दृष्टिकोनावर विश्वास ठेवल्याबद्दल मी ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओजचा मनापासून आभारी आहे.
महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित करणे विशेषतः अथपूर्ण वाटते आणि ज्या कलाकारांचे आपण फक्त स्वप्न पाहू शकतो, त्यांच्यासोबत हा चित्रपट करणे म्हणजे आपण खरोखर भाग्यवान आहोत.
हे पण वाचा: प्रियांका चोप्राची लेक मालतीसोबत खास वेळ – पाहा तिचे आईपणाचे अनमोल क्षण!