सोनल वेंगुर्लेकरची धमाकेदार एण्ट्री


झी टीव्हीवरील ‘जमाई नं. १’ मालिकेत अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर एका महत्त्वाच्या खलनायकी भूमिकेत सहभागी होत आहे. सोनल या मालिकेत सायली देशपांडे या भूमिकेत झळकणार आहे.

आपल्या भूमिकेबाबत सोनल वेंगुर्लेकर म्हणाली, मी नेहमीच असे मानते की, टेलीव्हिजनवरील खलनायिका या खूप खोल आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने लिहिल्या जातात. मुख्य पात्रांना बहुतेकवेळा सद्गुणीपणाच्या चौकटीत राहावे लागते, पण खलनायकी पात्रे ग्रे एरियामध्ये जाऊ शकतात आणि खरे नाट्य तिथेच असते.

एक कलाकार म्हणून मला ते खूपच रोमांचक वाटते. मला ‘जमाई नं. १’ मध्ये सहभागी होत असल्याचा खूप आनंद आहे! ही मालिका आधीच प्रेक्षकांशी जोडली गेली आहे आणि सायली म्हणून यात सहभागी होणे हे या कथानकात एक वेगळीच ऊर्जा आणते. ती पारंपरिक खलनायिका नाही, ती तीव्र, भावनांनी भरलेली आणि धोकादायकपणे बुद्धिमान आहे. तिचे वेड, तिचे कुटिल खेळ आणि ती घेऊन येणारी अनिश्चितता या भूमिकेला एकाचवेळी आव्हानात्मक आणि सर्जनशीलदृष्ट्या समाधानी बनवतात. प्रेक्षकांनी हा नवीन ट्विस्ट अनुभवावा, असे मला खरंच वाटते.