दरवर्षी साधारणतः सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडादरम्यान ‘बिग बॉस’ या रिअलिटी शोचा नवा सीझन प्रदर्शित होत असतो. मात्र यावर्षीच्या ‘बिग बॉस १९’ बाबत असे काही घडणार आहे, जे गेल्या १९ वर्षांमध्ये घडले नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीच्या बिग बॉसचा फॉर्मेट बनवण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी जिओवर हा शो सुरू झाल्यानंतर शोचे ओटीटी व्हर्जन सुरू करण्यात आले होते.
पहिला ओटीटी ‘बिग बॉस’ चे सूत्रसंचालन करण जौहरने केले होते तर दुसऱ्या सीझनचा सूत्रसंचालक सलमान खानच होता आणि गेल्या वर्षी अनि कपूरने ओटीटी ‘बिग बॉस ३’ चे सूत्रसंचालन केले होते.
दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल आत्तापर्यंत दरवर्षी बिग बॉसचा सीझन तीन सव्वा तीन महिने चालत असे. परंतु गेल्या अठरा वर्षांची आपली ही परंपरा तोडत यावर्षीचा ‘बिग बॉस’ तब्बल पाच-साडेपाच महिने चालणार आहे. ३० जुलै रोजी ‘बिग बॉस’ सुरू होणार असून तो जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सलमान खान ‘बिग बॉस’ चा प्रोमो शूट करणार असल्याची देखील बातमी आहे. सूत्रसंचालक म्हणून सलमानचा हा सोळावा सीझन असून ‘बिग बॉस’ म्हणजेच सलमान खान असे गणित बनले आहे. हा शो लोकप्रिय होण्यामध्ये सलमानचा फार मोठा हात आहे.
मध्यंतरी बातमी समोर आली होती की ‘बिग बॉस’ बनवणाऱ्या ‘इंडेमॉल प्रॉडक्शन हाऊस’ व ‘कलर्स’ चॅनलमध्ये काही वाद निर्माण झाल्यामुळे या वर्षीचा ‘बिग बॉस’ चा सीझन सोनी टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र याबाबतीत पुढे काही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही.
हे पण वाचा: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये दिसणार दिग्गजांची फौज! – नावं ऐकून थक्क व्हाल!