अजय देवगण व काजोल यांची मुलगी न्यासाच्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाबाबत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने एक मोठी हिंट दिली आहे. मनीषने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर न्यासाचा एक स्टनिंग फोटो शेअर केला आहे.
फोटोमधील न्यासाने मरून रंगाचा खूप सुंदर लेहंगा-चोली परिधान केली आहे. या फोटोसोबत मनीषने लिहिले आहे की, न्यासा, चित्रपट तुझी वाट बघत आहे. त्याच्या या पोस्टवर ओरीने लिहिले आहे की, तुझ्या चित्रपटाची वाट बघणे कठीण होत आहे. तर काजोलने एक हार्ट इमोजीद्वारे मुलीविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
1 thought on “काजोल आणि अजयची मुलगी सिनेमात पदार्पण करणार? वाचा सविस्तर!”
Comments are closed.