PM Kisan Yojana 13th Installment Date : आनंदाची बातमी ! पंतप्रधान किसान निधीचे या तारखेला पैसे बँक खात्यात…

या पोस्टमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योननेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत. जसे की पीएम किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याची शेतकरी बांधव अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. पीएम किसानचा हा हप्ता कोणत्याही दिवशी जाहीर केला जाऊ शकतो. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १७ ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हफ्ता जाहीर केला होता.

मात्र जवळपास सुमारे दोन कोटी शेतकरी बांधवांना या हप्त्याचा लाभ मिळू शकला नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपयांप्रमाणे प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. अशातच पीएम किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता बँकेत जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या १३ व्या हफ्त्याची लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मीडिया रिपोर्ट नुसार १३ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या २८ तारखेपर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जमा केले जाणार आहेत.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांक जोडणे म्हणजेच लिंक करणे बंधनकारक केले आहे.

आपल्या महाराष्ट्रात सध्या १४.३२ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची बँक खाकी त्यांच्या आधार कार्डची जोडलेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १३ व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नसल्याचे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक श्री विकास पाटील यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते आयपीपीबी (IPPB) म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये (India Post Payments Bank) उघडून ती खाती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय्या याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आयपीपीव्ही म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार कार्ड क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल असे सांगण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड खाते सरकारने अनिवार्य केले आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Comment