MSRTC ST Bus New Update: एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी

आज आपण या पोस्टमध्ये राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत.

महाराष्ट्राची लाल परी म्हणजेच एसटी बस (ST Bus) जी सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. मागील ७५ वर्षापासून ही सर्वांची लाडकी लाल परी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे.

एसटी महामंडळात सध्या निम आराम, साधी बस, शयनयान, आसन, आसन शयनयान आणि वातानुकूलित या प्रकारातील एसटी बसेस आहेत.

वातानुकूलित प्रकारातील केवळ शिवशाही मधूनच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत होता. मात्र शिवनेरी आणि अश्वमेध या आरामदायी व आलिशान बस गाड्यांमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट भाडे द्यावे लागत होते. म्हणजेच जेष्ठ नागरिकांना आणि सवलत धारकांना फुल तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. यामुळे सर्व सवलत धारक ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी नाराजी होती.

मात्र आता एक आनंदाची व दिलासा बातमी समोर आली आहे. अलीकडेच काही महिन्यापूर्वी वाहतूक विभागाने शिवनेरी आणि अश्वमेव या लक्झरी गाड्यांसाठी देखील अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळ प्रशासनाकडे पाठवला होता व तसेच ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देखील या आलिशान बस गाड्यांमधून म्हणजे शिवनेरी व अश्वमेध या गाड्यांमधून सवलत लागू करण्याबाबत सूचना देखील केल्या होत्या.

त्याला एसटी महामंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत आणि ६५ वर्षावरील सर्व नागरिकांना सवलतीच्या तिकीट दरात शिवनेरी आणि अश्वमेध या लक्झरी एसटी बस मधून प्रवास करण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सध्या ही सवलत मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ गरिकांसाठी आहे.

हे पण वाचा: PM Kisan Yojana 13th Installment Date : आनंदाची बातमी ! पंतप्रधान किसान निधीचे या तारखेला पैसे बँक खात्यात…

Leave a Comment